पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीतील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिली माहिती
 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीतील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिली माहिती 

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केली आहे. यामध्ये पंतप्रधान मोदी यांनी कोरोनामुळे त्रस्त असलेल्या आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. या चर्चेत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कोरोनाच्या परिस्थिती आढावा सादर केला.

देशभरात कोरोनाची दुसरी लाट येणार अशी भीती वर्तवली जात आहे. त्यामुळे कोरोनाच्या परिस्थितीचा पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत आहे. यावेळी 'महाराष्ट्रात कोरोना लसीकरण कशा रितीने करावे, लसीचे वितरण कसे करता येईल या संदर्भात टास्क फोर्स देखील स्थापन करण्यात आला आहे' अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.

Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


Post a Comment

Previous Post Next Post