“आधीच तुम्ही थकबाकीचा डोंगर करून ठेवलाय तो थोडा हलका होऊ द्या" : ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत

“आधीच तुम्ही थकबाकीचा डोंगर करून ठेवलाय तो थोडा हलका होऊ द्या" : ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत

 “आधीच तुम्ही थकबाकीचा डोंगर करून ठेवलाय तो थोडा हलका होऊ द्या" : ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत   
मुंबई : ग्राहकांनी वीजबिल भरावे, यासाठी कामगार संघटना मदतीला धावल्या आहेत. त्यांनी आपले महावितरण आपली जबाबदारी या अंतर्गत प्रचार मोहीम हाती घेतली आहे. याच दरम्यान ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. वीजबिले योग्य आहेत म्हणून स्वतःची वीजबिले भरणाऱ्या भाजपा आमदारांचे आभार असं म्हणत ऊर्जामंत्री राऊत यांनी भाजपाला सणसणीत टोला लगावला आहे. 

आपल्या ट्विटर अकाऊंटवरून नितीन राऊत यांनी याबाबत एक ट्विट केलं आहे. "वीजबिले योग्य आहेत म्हणून स्वतःची वीज बिले भरणाऱ्या भाजपा आमदारांचे आभार! आपल्याप्रमाणे जनतेला ज्यांना वीज बिल भरायची आहेत, त्यांना ती भरू द्या! आधीच तुम्ही थकबाकीचा डोंगर करून ठेवलाय तो थोडा हलका होऊ द्या" असं राऊत यांनी म्हटलं आहे. लॉकडाऊन नंतर वीजबिलाच्या थकबाकीचा डोंगर महावितरणसमोर उभा राहिला आहे
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज

Post a Comment

0 Comments