बिहारमध्ये अटीतटीच्या लढाईत एनडीएला बहुमत तर,तेजस्वी यादव यांचा राजकीय पटलावर थाटात प्रवेश


 


बिहारमध्ये अटीतटीच्या लढाईत एनडीएला बहुमत तर,तेजस्वी यादव यांचा राजकीय पटलावर थाटात प्रवेश
 बिहार : बिहारमधील सरकार स्थापनेचे अंतिम चित्र मध्यरात्री स्पष्ट झाले. बिहारच्या २४३ जागा असलेल्या विधानसभेत एनडीएला १२५ मिळाल्या. यामध्ये मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या जनता दल संयुक्तला ४२ जागांवर समाधान मानावे लागले. भाजपने चिराग पासवान यांचा खुबीने वापर करत ७५ जागांवर विजय मिळवला. चिराग यांनी नितीशकुमार यांच्या अनेक जागा पाडण्यात मोलाचा हातभार लावला. चिराग पासवान यांच्या एलजेपीने १३७ जागा लढवून फक्त एक जागा जिंकली आहे. 
दुसरीकडे महागठबंधनने ११० जागांवर विजय मिळवला. यामध्ये एकट्या सर्वांत मोठा पक्ष ठरलेल्या आरजेडीच्या ७६ जागांचा समावेश आहे. बिहारमध्ये तब्बल ७० जागांवर निवडणूक लढवून केवळ १९ जागांवर विजय प्राप्त केला. बिहारमध्ये डाव्या पक्षांनी १२ जागा जिंकत आपले अस्तित्व अजून असल्याचे दाखवून दिले. बिहारात लालू प्रसाद यादव यांचा राष्ट्रीय जनता दल सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. राजदने ७६ जागांवर मिळवला आहे. त्यानंतर भाजपला ७४ जागा मिळाल्या आहेत. 


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured