प्राथमिक शिक्षक बँकेची वाटचाल अधोगतीकडे म्हणणाऱ्यांच्या बुद्धीची कीव येते : यु.टी. जाधव

प्राथमिक शिक्षक बँकेची वाटचाल अधोगतीकडे म्हणणाऱ्यांच्या बुद्धीची कीव येते : यु.टी. जाधव


 


 


 


माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी : प्राथमिक शिक्षक बँकेची दमदारपणे प्रगतीकडे वाटचाल सुरु असून बँक १००० कोटींच्या उलाढालीच्या टप्प्यावर असून बँकेला तुच्छ लेखून दुसऱ्याच्या दारात उभे राहून इतर बँकांचे तुणतुणे वाजवणाऱ्यांची व बँकेची वाटचाल अधोगतीकडे म्हणणाऱ्यांच्या बुद्धीची कीव येत असल्याची टीका बँकेचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक यु.टी.जाधव यांनी विरोधकांवर केली असून त्यांचा सर्व आरोपांना उत्तरे दिली आहेत.


 


 


 यामध्ये नोकर भरती, कर्मचाऱ्यांना वर्षात दोन वेळा बोनस, बक्षीस पगार, अॅन्युअल मेंटेनिंग चार्जेस, बँकेची मालमत्ता खरेदीने वाढविणे, दरवर्षी सर्व शाखा रंगरंगोटी केल्या जातात म्हणे, इतर खर्च या हेड खाली कोण कोणते उपमुद्दे, संस्थेचे वेगवेगळे कार्यक्रम म्हणजे आदर्श शिक्षकांचा, सावित्रीच्या लेकींचा, गुणवंत पाल्यांचा सन्मान करणे, ठेवीवरील व्याजदर कमी, लाभांश वाटप, ठेवींचा व्याजदर या सर्व आरोपांना त्यांनी उतरे दिली आहेत.


 


  


 थोड्या दिवसात बँकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजणार म्हटल्यानंतर चार वर्षे तलवारी मॅन केलेल्या, आता कुठे तुम्ही बाहेर काढायला लागलाय. आणि आम्ही सुद्धा ठामपणे, ठोसपणे ,लोकशाही मार्गानेच सभासदांच्या समोर हिंमतीने जाऊ, आम्ही रडणारे नाही लढणारे मावळे आहोत असा इशाराचा दिला आहे. 


 


  


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


Post a comment

0 Comments