प्राथमिक आरोग्य केंद्रात ओपीडी तपासणी सुरू करा : परवेज तांबोळी

प्राथमिक आरोग्य केंद्रात ओपीडी तपासणी सुरू करा : परवेज तांबोळी


 


 


माणदेश एक्सप्रेस न्युज
कडेगाव : कडेगांव तालुक्यातील सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कोविड सेंटर सुरू करण्यात आली आहेत. यामुळे दुसर्याे आजारावर तालुक्यातील जनतेने उपचारासाठी कोठे जायचे असा प्रश्नस पडतो आहे. कोविड आजारामुळे इतर आजाराकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होते आहे सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड सेंटर उभारल्याने नाईलाजास्तव गोरगरीब जनतेला खाजगी दवाखान्यात जावे लागते आहे. त्यामुळे कडेगाव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ओपीडी सुरु करा अशी मागणी युवक राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष परवेझ तांबोळी यांनी निवेदनाद्वारे तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे केली आहे.


 


  


 


        पंधरा दिवसात कोविड रुग्णांची संख्या ही मर्यादित स्वरुपात सापडत आहे. खाजगी दवाखान्यात उपचाराचे प्रचंड बिल होते आहे हे सर्वसामान्य जनतेला न परवडनारे आहे. यामध्ये गोरगरीब जनतेची पिळवणूक होते आहे. काही दिवसांमध्ये ऊस हंगाम सुरू होत आहे यासाठी ऊसतोड मजूर या भागामध्ये यायला सुरुवात झाली आहे हे मजूर दिवसभर शेतात काम करतात व रात्री झोपडीत राहतात त्यांना दिवसभर काम करताना इजा होतच असते तर राहिला झोपडीत असल्यामुळे आजारी पडण्याचे प्रमाण अधिक असते त्यामुळे त्यांना उपचाराची गरज असते. पैशाअभावी त्यांना खाजगी रुग्णालयात उपचार घेणे परवडत नसल्याने त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचार घेणे शक्य आहे. 


           त्यामुळे वरील सर्व बाबींचा विचार करून कडेगाव तालुक्यातील प्राथमिक केंद्रामध्ये लवकरात लवकर ओपीडी सुरू करण्यात यावी अशी मागणी तांबोळी यांनी केली आहे. निवेदन देताना कडेगाव तालुका राष्ट्रवादी सोशल मिडीयाचे अध्यक्ष संदेश जाधव, युवक अध्यक्ष सुरेश शिंगटे, नवाज काझी, शाहीद पटेल यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.


 


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


Post a comment

0 Comments