...तर शिवाजी महाराजांनी पहिला कडेलोट संजय राऊतांचा केला असता : या भाजप नेत्याची शिवसेनेवर टीका

...तर शिवाजी महाराजांनी पहिला कडेलोट संजय राऊतांचा केला असता : या भाजप नेत्याची शिवसेनेवर टीका

...तर शिवाजी महाराजांनी पहिला कडेलोट संजय राऊतांचा केला असता : या भाजप नेत्याची शिवसेनेवर टीका मुंबई : चार लाख स्वयंसेवक हे मंदिराच्या वर्गणीनिमित्ताने संपर्क अभियान राबविणार आहेत. हे संपर्क अभियान म्हणजे रामाच्या आड २०२४ चा निवडणूक प्रचार आहे, असा आरोप शिवसेनेनं सामनाच्या संपादकीयमधून केला आहे. दरम्यान, यावरून भाजपा नेते निलेश राणे यांनी महाराज आज असते तर पहिला कडेलोट संजय राऊतांचा केला असता असं म्हणत यावर जोरदार हल्लाबोल केला.“लाज सोडली शिवसेनेनी. शिवसेनेने आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा आयुष्यभर फक्त वापर केला. महाराज आज असते तर पहिला कडेलोट संजय राऊतांचा केला असता. ज्यांचं घर वर्गणीतून चालतं तेच विचारतायत मंदिर वर्गणीतून बांधणार काय? जनाची नाही पण किमान मनाची लाज तर ठेवा,” असं म्हणत राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून शिवसेनेवर निशाणा साधला.

 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज

Post a comment

0 Comments