Type Here to Get Search Results !

दिल्ली येथील शेतकरी अंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बार्शीत सर्वपक्षीय धरणे आंदोलन



दिल्ली येथील शेतकरी अंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बार्शीत सर्वपक्षीय धरणे आंदोलन

माणदेश एक्सप्रेस न्युज


बार्शी : केंद्र सरकारणे शेतकरी विरोधी शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा) विधेयक 2020, शेतकरी (हक्क आणि सुरक्षा) किंमत हमी आणि कृषी सेवा करार विधेयक 2020,  अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) विधेयक 2020 हे तीन कायदे संमत केले आहेत. याचा विरोध करण्यासाठी व दिल्ली अंदोलनाला पठिंबा देणार्‍या देशव्यापी बंदला पाठिंबा देण्यासाठी बार्शी मध्ये सर्वपक्षीय धरणे आंदोलन तहसिलदार कचेरीसमोर आज दिनांक 14 डिसेंबर 2020 रोजी भाउसाहेब आंधळकर व कॉम्रेड तानाजी ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. हा मोर्चा शेतकरी, सर्वपक्षीय, कामगार वर्ग, विद्यार्थी कृती समिती यांच्या वतीने काढण्यात आले.  यावेळी रावसाहेब दानवेंचा निषेध करण्यात आला त्यासोबतच नांदेड येथील मूकबधिर मुलीवर झालेला बलात्कार व खूनाचा निषेध व्यक्त करून आरोपींना फाशी देण्याची मागणी करण्यात आली.


यावेळी कॉम्रेड तानाजी ठोंबरे म्हणाले,  दिल्लीमधील लढणारे शेतकरी जिगरबाज आहेत त्यांचा आदर्श घेऊन पुढे लढाई शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत घेऊन जावी लागेल.  आता घरामध्ये बसून भागणार नाही, शिवाजी महाराज, भगतसिंग शेतकऱ्यांना समजावून सांगावा लागेल.  भाजपने संमत केलेले तीन कृषी कायदे शेतकरी विरोधी असताना देखील भाजपा ते शेतकऱ्यांच्या कसे फायद्याचे आहे हे समजून सांगत आहे.  भाजपच्या दानवे चा निषेध करावा तेवढा थोडाच आहे.


भाउसाहेब आंधळकर म्हणाले, मोदी अंबानींच्या नातवाला भेटायला जातात शेतकऱ्यांना भेटायला त्यांना वेळ नाही.  कृषी उत्पन्न बाजार समिती जीवनावश्यक वस्तू यांचा बाजार मांडून ते भांडवलदारांच्या ताब्यात देण्याचा घाट सरकारने घातला आहे.  हा कट आम्ही शेतकरी कामगारांच्या लढ्याने उध्वस्त करून टाकू.


या मोर्चात अखिल भारतीय किसान सभा, शिवसेना, काँग्रेस आय, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, वंचित बहूजन आघाडी, अधश्रध्दा निर्मूलन समिती,मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, आयटक डॉ. जगदाळे मामा हॉस्पीटल श्रमिक संघ, आयटक बांधकाम कामगार संघटना, ऑल इंडिया स्टुडंन्टस फेडरेशन, भारत मुक्ती मोर्चा, उडाण फाउंडेशन, राष्ट्रवादी लिगल सेल, आयटक ग्रामपंचायत कर्मचारी संघटना,आदिवाशी संघटना, राजमाता इंदूताई आंधळकर अन्नछत्रालय, भिम टायगर संघटना, प्रहार संघटना, छावा संघटना सहभागी झाल्या होत्या.


यावेळी झालेल्या सभेपूढे अॅड. आरगडे मॅडम, दिपक आंधळकर, कॉ. लक्ष्मण घाडगे, प्रा. कॉ. एस.एस. जाधव, प्रा. डॉ.  अशोक कदम, जुगल किशोर तिवारी ,शलाकाताई पाटील, कॉ. प्रविण मस्तुद, कॉ. शौकष शेख, कॉ. अनिरूध्द नखाते,तानाजी जगदाळे, विवेक गजशिव, तानाजी बोकेफोडे, पवन आहिरे, शाफीन शेख, जीमल खान, वसिम पठाण, अविराज चव्हाण, भारत पवार, भारत भोसले, शंकर वाघमारे आदी उपस्थित होते. 


Join Free Whatasup Group माणदेश एक्सप्रेस















टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies