गुजरातमधून भाजपला मोठा धक्का ; “या” भाजपा खासदाराचा पक्षाला राजीनामा

गुजरातमधून भाजपला मोठा धक्का ; “या” भाजपा खासदाराचा पक्षाला राजीनामा

 गुजरातमधून भाजपला मोठा धक्का ; “या” भाजपा खासदाराचा पक्षाला राजीनामा गुजरात : गुजरातमधून भाजपला मोठा धक्का बसलेला आहे. गुजरातमधील भाजपा खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री मनसुख वसावा यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लोकसभेच्या सदस्यत्वाचाही राजीनामा देणार असल्याचे त्यांनी जाहीर केलं आहे.नर्मदा जिल्ह्यातील १२१ गावांना पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलं होतं. वने, पर्यावरण आणि हवामान बदल मंत्रालयाने त्याबद्दल जारी केलेली अधिसचूना मागे घ्यावी अशी मागणी मनसुख वासवा यांनी गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्याकडे एका पत्राच्या माध्यमातून केली होती. या अधिसुचनेमुळे या १२१ गावांमधील आदिवासींकडून उठवला जाणारा आवाज तसेच निषेधाचा प्रभाव कमी करण्याचा हेतू असल्याचे सांगण्यात येत आहे. ५ मे २०१६ रोजी स्कुल्पनेश्वर अभयारण्य आणि आजूबाजूच्या गावांना संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्याचा जी अधिसूचना वने, पर्यावरण आणि हवामान बदल मंत्रालयाने जारी केली होती त्याचा वसावा यांनी विरोध केला होता.संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लोकसभा अध्यक्षांची भेट घेतल्यानंतर आपण लोकसभेच्या सदस्यत्वाचाही राजीनामा देणार असल्याचे वसावा यांनी पत्रात म्हटलं आहे. पक्षाशी एकनिष्ठ राहण्याचा आणि आयुष्यात पक्षाची मूल्ये आत्मसात करण्याचा आपण सदैव प्रयत्न केला. आपण माणूस आहोत. माणसाकडून चुका होतात, असाही उल्लेख त्यांनी पत्रात केला आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युजPost a comment

0 Comments