सावधान : तुमच्या गाडीला फास्टॅग नसेल तर होणार अशी कारवाई

सावधान : तुमच्या गाडीला फास्टॅग नसेल तर होणार अशी कारवाई




 सावधान : तुमच्या गाडीला फास्टॅग नसेल तर होणार अशी कारवाई 



नवी दिल्ली :  १५ डिसेंबरपासून सर्व टोलनाके कॅशलेस होण्याच्या तयारीत आहेत. या दरम्यान कॅश लेनही सुरु राहणार असली तरी फास्टॅग हा अनिवार्य असेल. फास्टॅगबद्दल वाहनचालकांमध्ये जागृकता आणण्यासाठी टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांकडून प्रयत्न केले जातायत. अद्यापही अनेक गाड्यांवर फास्टॅग दिसत नसल्याचे टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांचे निरीक्षण आहे. नव्या वर्षापासून म्हणजेच १ जानेवारीपासून फास्टॅग नसलेल्या वाहनांवर मोठा भूर्दंड बसणार आहे. फास्टॅग नसलेल्या वाहन चालकांकडून टोल नाक्यांवर दुप्पट टोल वसूल केला जाणार आहे. 




टोलनाके कॅशलेस झाल्याने तसेच फास्टॅगच्या येण्याने कर्मचाऱ्यांसोबतच वाहनचालकांचा देखील वेळ वाचणार आहे. टोल नाक्यांवरील गर्दी कमी तसेच नसण्याच्या बरोबरच होईल. आपत्कालिन स्थितीत कोणालाही टोल नाक्यांवरील रांगेत राहण्याची गरज नसेल. फास्टटॅगचे विशिष्ट अकाऊंट तयार असेल त्यातून टोलचे पैसे आपोआप कट होणार आहेत. तसेच टोलनाक्यावर वाहनाची ओळखही होणार आहे. यातील रक्कम संपल्यानंतर  फास्टटॅगला पुन्हा रिचार्ज करावा लागणार आहे. 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज







Post a comment

0 Comments