राज्यातील कोरोनाचा रिकव्हरी रेट ९४.२६ टक्क्यांवर

राज्यातील कोरोनाचा रिकव्हरी रेट ९४.२६ टक्क्यांवर

 

राज्यातील कोरोनाचा रिकव्हरी रेट ९४.२६ टक्क्यांवर मुंबई : देशभरातील कोरोना महामारीने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान,राज्यात सोमवारी नव्या २८३४ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून ५५ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यभरातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ५९४६९ झाली आहे. तसेच ६०५३ जणांनी कोरोनावर मात केली असल्याची माहिती राज्य आरोग्य विभागाने दिली आहे.राज्यात आतापर्यंत ४८ हजार ८०१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत एकूण १७,८९,९५८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच कोरोनाचा रिकव्हरी रेट ९४.२६ टक्क्यांवर पोहचला आहे. त्यामुळे महाराष्ट्र कोरोनामुक्तीच्या दिशेने वेगाने वाटचाल करू लागल्याचे स्पष्ट संकेत मिळू लागले आहेत. मात्र परदेशातील कोरोनाचा उद्रेक पाहता नागरिकांनी सावधगिरी बाळगणे खूप आवश्यक असणार आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युजPost a comment

0 Comments