राज्यमंत्री बच्चू कडू यांना नागपुरातच विश्रामगृहाबाहेर पोलिसांनी रोखले

राज्यमंत्री बच्चू कडू यांना नागपुरातच विश्रामगृहाबाहेर पोलिसांनी रोखले

  
राज्यमंत्री बच्चू कडू यांना नागपुरातच विश्रामगृहाबाहेर पोलिसांनी रोखले नागपूर : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वात आज मुंबईत रिलायन्स कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. पण बच्चू कडू यांना पोलिसांनी नागपुरातच रोखून धरलं आहे. बच्चू कडू थांबलेल्या विश्रामगृहाबाहेर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सकाळी विमानाने बच्चू कडू मुंबईला रवाना होणार होते. पण पोलिसांनी त्यांना विश्रामगृहाच्या दारातच अडवून धरले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे अंबानींचं ऐकतात म्हणून रिलायन्स कार्यालयावर मोर्चा काढला जाणार असल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलं. रिलायन्स कार्यालयात अंबानींना भेटण्यासाठी जात आहे.आमच्या आंदोलनामुळे दिल्लीतील आंदोलनावर काही विपरीत परिणाम होऊ नये, अशी मुख्यमंत्र्यांची भूमिका असावी, त्यामुळे आपल्याला इथं रोखलं जात असल्याचं मत बच्चू कडू यांनी व्यक्त केलंय.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युजPost a comment

0 Comments