गॅस सिलिंडरच्या किंमतीत पुन्हा एकदा वाढ

गॅस सिलिंडरच्या किंमतीत पुन्हा एकदा वाढ

 

गॅस सिलिंडरच्या किंमतीत पुन्हा एकदा वाढ मुंबई :  तेल कंपन्यांनी एलपीजीच्या गॅसच्या किंमतीत ५० रुपयांची वाढ केली आहे. पंधरवड्यातील ही दुसरी वाढ आहे. डिसेंबरमध्ये आजपासून सिलिंडर बुक करताना १०० रुपये अधिक द्यावे लागतील. यापूर्वी ३ डिसेंबर रोजी ५० रुपयांची वाढ झाली होती. ही वाढ विनाअनुदानीत १४.२ किलो घरगुती आणि १९ किलो व्यावसायिक सिलिंडर्सवर केली गेली आहे. घरांमध्ये वापरल्या जाणाऱ्या गॅस सिलिंडरच्या किंमतीत ५० रुपयांनी वाढवण्यात आल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी कात्री लागणार आहे.तेल कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या किंमती पुन्हा एकदा वाढवल्या आहेत. दोन आठवड्यांतच कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत १०० रुपयांची वाढ केली आहे. दुसरीकडे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ८ दिवसांपासून स्थिर असल्यामुळे लोकांना दिलासा मिळाला आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युजPost a comment

0 Comments