Type Here to Get Search Results !

‘ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी अमृता फडणवीस यांनी गाऊ नये’ : ऑनलाइन याचिकेतून टीका




 

‘ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी अमृता फडणवीस यांनी गाऊ नये’ : ऑनलाइन याचिकेतून टीका 



मुंबई : विरोधीपक्ष नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये आपल्या नवीन गाण्याची घोषणा केली. “येत्या गुरुवारी माझं अजून एक गाणं येत आहे त्यावरही ट्रोलिंग करा. सर्वांच स्वागत आहे,” असं म्हणाल्या आहेत. मात्र अमृता यांनी केलेली घोषणा आणि त्यामधील ट्रोलिंगचं आमंत्रण नेटकऱ्यांनी फारच गांभीर्याने घेतल्याचे दिसत आहे. तसेच हे येणारं नवीन गाणं हे प्रमोशनल साँग असून प्रत्यक्षात चित्रपटातही त्याचा वापर करण्यात आला आहे. हे गाणं एन्जॉय करा, ट्रोल करा पण नक्की पाहा असं आवाहनही अमृता यांनी केलं. मात्र हे गाणं प्रदर्शित होण्याआधीच अमृता यांना ट्रोलर्सने पुन्हा लक्ष्य केलं आहे. विशेष म्हणजे काही तासांमध्ये ४०० हून अधिक जणांनी या ऑनलाइन याचिकेचं समर्थन केलं आहे.


चेंज डॉट ओआरजी या वेबसाईटवर हुनमंत ढोमे नावाच्या युझरने सोमवारी ‘पर्यावरणाचे सौरक्षण करण्यासाठी आणि ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी अमृता फडणवीस यांनी गाऊ नये,’ अशी ऑनलाइन याचिका दाखल केली आहे.  या ऑनलाइन याचिकेच्या डिस्प्रिप्शनमध्ये अमृता यांचा उल्लेख मामी असाही करण्यात आलाय. “पुढच्या गुरुवारी मामींचे नवीन गाणे येणार आहे. या गाण्याने होणारे ध्वनिप्रदूषण माणसाला घातक ठरू शकते. हे गाणे त्यांनी रिलीज करू नये यासाठी आपण पेटीशन साइन करणे गरजेचे आहे,” असं या याचिकेच्या डिस्प्रिप्शनमध्ये म्हटलं आहे. तसेच पुढे, “आपला कान, आपली जबाबदारी” असंही लिहिण्यात आलं आहे.

 

Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies