“अन्यथा मी त्यांना जीवंत जमिनीखाली १० फूट गाडून टाकीन” : मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान
 “अन्यथा मी त्यांना जीवंत जमिनीखाली १० फूट गाडून टाकीन” : मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहानहोशंगाबाद : “मध्य प्रदेश सोडा अन्यथा जमिनीत गाडून टाकेन, अन् कोणाला पत्ताही लागणार नाही,” अशा शब्दांत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी काही लोकांना गंभीर इशारा दिला. एका कार्यक्रमादरम्यान खूपच आक्रमक पद्धतीने त्यांनी भाषण दिलं.मुख्यमंत्री चौहान म्हणाले, “मी सध्या खतरनाक मूडमध्ये आहे. जे लोक चुकीचं काम करतात त्यांना मी सोडणार नाही. त्यांना मी सांगू इच्छितो की त्यांनी मध्य प्रदेश सोडावं अन्यथा मी त्यांना जीवंत जमिनीखाली १० फूट गाडून टाकीन आणि कोणाला पत्ताही लागणार नाही.”चौहान यांचा या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. मध्य प्रदेशातील होशंगाबाद येथे एका कार्यक्रमादरम्यान ते आक्रमक पद्धतीने बोलत होते. एएनआयने हा व्हिडिओ ट्विट केला असून यात त्यांनी माफिया लोकांना थेट धमकीच दिली आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युजPost a Comment

Previous Post Next Post