Type Here to Get Search Results !

मागासवर्गीय अधिकारी-कर्मचारी यांचा सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नतीचा मार्ग मोकळा

 मागासवर्गीय अधिकारी-कर्मचारी यांचा सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नतीचा मार्ग मोकळामुंबई : सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नतीस पात्र असलेल्या मागासवर्गीय अधिकारी-कर्मचारी यांची पदोन्नती 2017 पासून थांबविण्यात आली होती. उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रीगट उपसमितीच्या आजच्या बैठकीत मागासवर्गीय अधिकारी-कर्मचारी यांचा सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला आहे.  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पदोन्नतीतील आरक्षणाबाबत स्थापन करण्यात आलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली. सर्वच स्तरावरील पदोन्नतीतील आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान ४ ऑगस्ट, २०१७ रोजी मुंबई उच्च न्यायालयाने पदोन्नतीतील आरक्षण रद्द केल्यावर सर्वोच्च न्यायालयात राज्य शासनाने या निर्णयाला आव्हान दिले.  सामान्य प्रशासन विभागाने २९ डिसेंबर, २०१७च्या पत्रानुसार आरक्षणाचा लाभ घेतलेल्या मागासवर्गीय कर्मचारी  व अधिकारी यांना सेवाज्येष्ठतेनुसार खुल्या प्रवर्गातून पदोन्नती देण्यास निर्बंध घातला होता. हे परिपत्रक रद्द करण्याचा निर्णय उपसमितीने एकमताने घेतला, अशी माहितीही राऊत यांनी दिली. 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज
Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies