शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांना कोरोनाची लागण

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांना कोरोनाची लागण
 शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांना कोरोनाची लागणऔरंगाबाद : शिवसेना नेते तथा औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. चंद्रकांत खैरे यांनी फेसबुक पोस्टद्वारे त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना कोरोना चाचणी करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी लिहिले, ''माझी आज कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली असून कृपया माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली तपासणी करुन घ्यावी. माझी प्रकृती ठीक असून खबरदारीचा उपाय म्हणून खाजगी रुग्णालयात दाखल झालो आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने लवकरच बरा होऊन पुन्हा आपल्या सेवेत दाखल होईल''. खैरे शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समृद्धी महामार्ग पाहणी दौऱ्यात सहभागी होते.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


Post a comment

0 Comments