दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत रुग्णालयात दाखल




 दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत रुग्णालयात दाखल



हैदराबाद : दाक्षिणात्य सुपरस्टार आणि ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांच्या अन्नाथे या चित्रपटाच्या सेटवर ८ जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आले आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून रजनीकांतही क्वारंटाइन झाले होते. आता त्यांना रक्तदाबाचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रजनीकांत यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली. तसंच त्यांना सध्या इतर कसलाही त्रास जाणवत नसल्याचंही रुग्णालयाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.



हैदराबादच्या अपोलो रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं आहे. या रुग्णालयानेच प्रसिद्धीपत्रक काढून ही माहिती दिली आहे. रजनीकांत यांना रक्तदाबाचा त्रास सुरु झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दोन दिवसांपूर्वीच ते शुटिंग करत असलेल्या चित्रीकरणाच्या ठिकाणी आठ जणांना कोरोनाची लागण झाली. त्यानंतर रजनीकांत यांचीही कोरोना चाचणी करण्यात आली पण ती निगेटिव्ह आली.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज




Post a Comment

Previous Post Next Post