काँग्रेसच्या या ज्येष्ठ नेत्याचे निधन ; राहुल गांधी यांनी केले दु:ख व्यक्त

काँग्रेसच्या या ज्येष्ठ नेत्याचे निधन ; राहुल गांधी यांनी केले दु:ख व्यक्त
काँग्रेसच्या या ज्येष्ठ नेत्याचे निधन ; राहुल गांधी यांनी केले दु:ख व्यक्त नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मोतीलाल व्होरा यांचे सोमवारी वयाच्या 93 व्या वर्षी निधन झाले. व्होरा यांना मूत्र संसर्गाचा त्रास असल्याने त्यांच्यावर दिल्ली येथील फोर्टिस एस्कॉर्ट हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. मात्र, वृद्धापकाळ आणि मूत्र संसर्ग झाल्याने उपचार सुरु असताना त्यांचे निधन झाले. मोतीलाल व्होरा हे मध्य प्रदेशच्या राजकारणातील मोठे नाव आहे. काँग्रेस पक्षाच्या जडणघडणीत मोतीलाल व्होरा यांचा मोठा वाटा राहीलेला आहे. मोतीलाल व्होरा यांच्या निधनानंतर काँग्रेस पक्षातर्फे त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विट करत त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी असल्याचे सांगितले. व्होरा यांच्या निधनामुळे काँग्रेसने एक सच्चा कार्यकर्ता, काँग्रेसच्या विचारधारेशी एकनिष्ठ राहणारा नेता गमावला, असे म्हणत राहुल गांधी यांनी दु:ख व्यक्त केले.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युजPost a comment

0 Comments