Type Here to Get Search Results !

तुमच्या मोबाईलवरती येणाऱ्या अशा लिंकवर क्लिक करु नका ; महाराष्ट्र सायबर विभागाचे नागरिकांना आवाहन




 तुमच्या मोबाईलवरती येणाऱ्या अशा लिंकवर क्लिक करु नका ; महाराष्ट्र सायबर विभागाचे नागरिकांना आवाहन 



मुंबई : एकीकडे कोरोनाबाधितांची संख्या वाढत असतानाच दुसरीकडे मागील काही महिन्यांपासून सोशल मिडियावरील अफवांचे प्रमाणही वाढलं आहे. पोलिसांपासून सरकारी यंत्रणांपर्यंत आणि नोकरीपासून ते घर बसल्या पैसे कमवण्याच्या जाहिरातींपर्यंत अनेक विषयांसदर्भातील अफवा सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून व्हायरल केल्या जात आहे. अशीच एक अफवा सध्या चर्चेत आहे ती म्हणजे घरबसल्या मोबाईलचा वापर करुन दिवसाला काही हजार कमवा. मात्र अशा अफवांना लोकांनी बळी पडू नये असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.



या मेसेजमध्ये एक पार्ट टाइम नोकरी करण्याची संधी चालून आली आहे असा दावा करण्यात आलाय. या माध्यमातून दिवसाला दोनशे ते तीन हजार रुपयांपर्यंत कमाई करता येईल. दिवसातून केवळ १० ते ३० मिनिटं काम करावं लागेल. खालील लिंकवर क्लिक करुन नाव नोंदवा. नाव नोंदवल्यानंतर तुम्हाला ५० रुपये मिळतील, असं सांगून खाली एक लिंक दिलेली असते. 



मात्र हा फसवणुकीचा प्रकार असून नागरिकांनी याला बळी पडू नये असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. मुंबई पोलिसांच्या सायबर सेलमधील सायबर गुन्हे विभागाच्या पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर यांनी हा मेसेज म्हणजे फसवणुकीचा प्रकार असल्याची माहिती दिली. नागरिकांनी या लिंकवर क्लिक करु नये असं आवाहनही करंदीकर यांनी  नागरिकांना केलं आहे. सध्याच्या काळात भारत-चीन सीमेवरील वादाच्या पार्श्वभूमीवर चिनी हॅकर्स भारतावर मोठा सायबर हल्ला करण्याची शक्यता असल्याने सतर्कता बाळगावी, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागामार्फत करण्यात आले होते.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज



 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies