सैराटमधल्या आर्चीसह ‘छूमंतर’ चित्रपटाची संपूर्ण टीम अडकली लंडनमध्ये

 सैराटमधल्या आर्चीसह ‘छूमंतर’ चित्रपटाची संपूर्ण टीम अडकली लंडनमध्येमुंबई : ब्रिटनमध्ये सापडलेल्या नव्या कोरोना स्ट्रेनमुळे सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. मात्र 'सैराट' फेम 'आर्ची' म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगुरू लंडनमध्ये अडकली आहे. रिंकू तिच्या आगामी ‘छूमंतर’ चित्रपटाच्या शुटिंगंच्या निमित्ताने सध्या लंडन दौऱ्यावर आहे. रिंकूसोबतच ‘छूमंतर’ चित्रपटाची संपूर्ण टीम सध्या लंडनमध्ये अडकली आहे. याचा फटका फक्त रिंकूला बसला नसून संपूर्ण चित्रपटाच्या टीमला बसला आहे. ‘छूमंतर’ चित्रपटाचे शुटिंग इंग्लंडमध्ये सुरू आहे. चित्रपटामध्ये अभिनेत्री प्रार्थना बेहरे, रिषी सक्सेना अभिनेता सुव्रत जोशी आणि 'नाळ' चित्रपटातील बालकलाकार श्रीनिवास पोकळेही इंग्लंडमध्ये शुटिंग करत आहे. लंडनमध्ये पुन्हा लॉकडाऊन सुरू झाल्यामुळे कलाकार त्याठिकाणी अडकले आहेत. 'सैराट' चित्रपटानंतर रिंकूने चाहत्यांच्या मनात अधिराज्य गाजवले आहे. तिने मराठी चित्रपटांशिवाय अनेक वेब सीरिजमध्ये देखील महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहे. 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युजPost a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured