महाराष्ट्रात आढळले नवीन कोरोनाचे दोन संशयित रुग्ण

महाराष्ट्रात आढळले नवीन कोरोनाचे दोन संशयित रुग्ण

 महाराष्ट्रात आढळले नवीन कोरोनाचे दोन संशयित रुग्ण 


मुंबई : परदेशातील नव्या कोरोनाचा प्रसार महाराष्ट्रात होतोय कि काय अस काहीसं चित्र दिसू लागले आहे. इंग्लंडमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या नवीन कोरोना विषाणूमुळे बाधित झालेला संशयित रुग्ण नागपुरात आढळला आहे. इंग्लंडहून परतलेल्या या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या नागपूर व गोंदियातील अनेकांना कोरोनाची बाधा झाली आहे. या रुग्णाला तातडीने मेडिकल रुग्णालयातील विशेष वार्डात दाखल करून त्याचे नमूने चाचणीसाठी पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळासह मेडिकलच्याही प्रयोगशाळेत तपासले जाणार आहेत.दरम्यान,नागपूरसह आता नव्या कोरोनाचा आणखी एक संशयित सापडल्याचे समोर आले आहे. दिल्लीत नव्या कोरोनाच्या संशयित रुग्णाला लोकनायक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ब्रिटनहून मंगळवारी आलेल्या प्रवाशाला कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, रुग्ण असिम्टमॅटिक असल्याची रुग्णालयाने माहिती दिली आहे.ब्रिटनमधून मंगळवारी ही व्यक्ती भारतात दाखल झाली. त्यावेळी केलेल्या तपासणीत ही व्यक्ती कोरोना बाधित आढळली. या प्रवाशाला कुठलीही लक्षणे नसल्याची माहीती लोकनायक रुग्णालयाचे संचालक डॉ सुरेश कुमार यांनी दिली. या प्रवाशाच्या आता अनेक तपासण्या करण्यात येत आहेत. त्यातूनच नव्या कोरोनाची बाधा झालीय की जुन्या कोरोनाची ही माहिती स्पष्ट होईल.या रुग्णाची प्रकृती स्थिर आहे. ब्रिटनमध्ये आढळलेला नवा स्ट्रेन ७० टक्के वेगाने पसरतो त्यामुळे योग्य खबरदारी बाळगण्याचे आवाहन प्रशासनाकडून सातत्याने केले जात आहे. या नव्या स्ट्रेनमुळे तरुणांना सर्वाधिक बाधा होत असल्याचंही संशोधनाअंती पुढे आले आहे. ब्रिटनहून आलेल्या प्रवाशांसाठी आयसोलेशनची वेगळी व्यवस्था केल्याची मागिचीही प्रशासनाने दिली आहे. 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युजPost a comment

0 Comments