१२ डिसेंबर 2020 पासून पोस्ट ऑफिसच्या नियमामध्ये असे होणार बदल...

 १२ डिसेंबर 2020 पासून पोस्ट ऑफिसच्या नियमामध्ये असे होणार बदल...नवी दिल्ली : 12 डिसेंबर 2020 पासून पोस्ट ऑफिसच्या नियमामध्ये बदल होणार आहेत. नव्या नियमानुसार, 11 डिसेंबरपर्यंत ग्राहकांना पोस्ट ऑफिस बचत खात्यात किमान 500 रुपये शिल्लक ठेवणे आवश्यक आहे. 12 डिसेंबरला ग्राहकांच्या खात्यात किमान बॅलन्स नसेल तर देखभाल शुल्क द्यावे लागणार आहे. इंडिया पोस्टने ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे. इंडिया पोस्टने एका ट्वीटमध्ये लिहिले आहे की, आता पोस्ट ऑफिस सेव्हिंग खात्यात किमान बॅलन्स ठेवणे बंधनकारक आहे. इंडिया पोस्टने माहिती देताना म्हटले आहे की, 11 डिसेंबर 2020 नंतर पोस्ट ऑफिसच्या बचत खात्यावर लागू होणारी देखभाल फी टाळण्यासाठी आपल्या खात्यात लवकरच किमान 500 रुपयांचा बॅलन्स निश्चित करा. अन्यथा आर्थिक वर्षाच्या अखेरीस देखभालच्या नावाखाली खात्यातून 100 रुपये वजा केले जातील.इंडिया पोस्टच्या अधिकृत वेबसाइटनुसार पोस्ट ऑफिस बचत खात्यावर वार्षिक व्याज दर 4 टक्के आहे. व्याज कमीतकमी बॅलन्स रकमेच्या आधारे महिन्याच्या 10 व्या आणि महिन्याच्या शेवटी कॅलक्युलेशन केले जाते. ग्राहक जवळच्या कोणत्याही पोस्ट ऑफिसमधून त्यांच्या सोयीनुसार ते खाते उघडू शकतात.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज

Post a Comment

Previous Post Next Post