Type Here to Get Search Results !

मद्यपान करण्याच्या बाबतीत महाराष्ट्र आहे या क्रमांकावर




 मद्यपान करण्याच्या बाबतीत महाराष्ट्र आहे या क्रमांकावर 



नवी दिल्ली : महाराष्ट्रातील पुरुष दारू पिण्याच्या बाबतीत देशात तिसऱ्या क्रमांकावर आहेत. तर सर्वाधिक मद्यपान कर्नाटकमधील पुरुष करतात. दारूबंदी असलेल्या गुजरात आणि जम्मू-काश्मीरमधील सर्वात कमी पुरुष मद्यपान करतात. तथापि, मागील सर्वेक्षणांच्या तुलनेत, मद्यपान करणाऱ्यांच्या संख्येत काही बदल झाले आहेत की नाही याबाबतची माहिती मिळालेली नाही. १५-४९ वयोगटातील लोकांचे २०१५-१६ च्या सर्वेक्षणात सर्वेक्षण केले गेले, तर १५ वर्षांवरील सर्व लोकांचा नवीन सर्वेक्षणात समावेश आहे.



ईशान्येकडील सिक्कीम राज्यातील महिला १६.२% आकडेवारीसह मद्यपान करण्यात अव्वल आहेत, तर आसाममधील ७.३% महिला मद्यपान करतात आणि हे राज्य दुसर्या  क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे तेलंगणाचे पुरुष दारू पिण्याच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहेत, तर महिलाही मागे नाहीत, दारू पिण्यात त्यादेखील तिसर्याण क्रमांकावर आहेत. या सर्वेक्षणानुसार गोवा आणि तेलंगणा वगळता ईशान्येकडील महिला सर्वाधिक मद्यपान करतात.



शहरी महिलांपेक्षा खेड्यांमधील स्त्रिया तुलनेने जास्त दारू पितात. हीच परिस्थिती देशातील बर्याखच भागात आहे. गावातील स्त्रिया मद्यपान करते असे सांगण्यात अजिबात संकोच करत नाहीत, हेदेखील यामागचे कारण असू शकते. तर याबद्दल सांगताना शहरी महिला थोडासा संकोच करतात. शहरी आणि ग्रामीण पुरुष मद्यपान करतात, पण महिलांएवढे त्यांच्यात अंतर नाही.



तंबाखूचा वापर देशातील सर्व राज्यांमध्ये सर्वाधिक आहे. तंबाखूजन्य पदार्थांवर खाल्ल्यामुळे त्यांना कर्करोग होईल अशी जाहिरात करूनही लोकांमध्ये प्रचंड व्यसन आहे. पूर्वीच्या सर्वेक्षणात असेही समोर आले आहे की, लोक दारूपेक्षा जास्त तंबाखू खातात. ईशान्येकडील मिझोरममध्ये ७७.८ टक्के पुरुष तंबाखूचे सेवन करतात तर ६५ टक्के स्त्रियांनाही तंबाखूचे व्यसन आहे. हे राज्य तंबाखूच्या वापराच्या बाबतीत आघाडीवर आहे. ईशान्य राज्यात महिला आणि पुरुषांमध्ये तंबाखूचा सर्वाधिक वापर आहे. दक्षिणेकडील केरळ राज्यात सर्वात कमी तंबाखूचा वापर होतो, जेथे केवळ १७ टक्के लोक तंबाखूचे सेवन करतात. १८ टक्के पुरुष गोव्यात तंबाखू खातात. महिलांच्या तंबाखू सेवनाच्या बाबतीत, हिमाचल प्रदेशात १.७ % तंबाखूचे सेवन केले जाते.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज








टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies