'घरात जसं जावा आणि दिराचं भांडण असतं तसं सरकारचं सुरू आहे’ : नवनीत राणा

'घरात जसं जावा आणि दिराचं भांडण असतं तसं सरकारचं सुरू आहे’ : नवनीत राणा
 'घरात जसं जावा आणि दिराचं भांडण असतं तसं सरकारचं सुरू आहे’ : नवनीत राणाअमरावती : काँग्रेसने नामांतराला विरोध केल्यानंतर भाजपनेही शिवसेनेला कोंडीत पकडत टीकास्त्र सोडलं. महाविकास आघाडी व भाजप असे राजकीय वातावरण चांगलेच तापलेले दिसून येत आहे. यावर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी ठाकरे सरकावर जोरदार टीका केली आहे.'घरात जसं जावा आणि दिराचं भांडण असतं तसं सरकारचं सुरू आहे. जबरदस्तीने सरकारमध्ये राहणं आणि विचार न पटणं अशी अवस्था त्यांची झाली आहे, हे लोकांना स्पष्ट दिसत आहे,' असं म्हणत नवनीत राणा यांनी सरकारवर हल्लाबोल केला.'विचार जमतं नसताना शिवसेना,काँग्रेस, राष्ट्रवादी पक्ष यांची युती झाली आहे. त्यामुळे विचार जमत नसेल तर तुम्ही एकमेकांना सोडा,' असा सल्लाही खासदार नवनीत राणा यांनी महाविकास आघाडीला दिला आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युजPost a comment

0 Comments