हवालदारवाडी ग्रामपंचायत बिनविरोध करण्यास ग्रामस्थांना यश

हवालदारवाडी ग्रामपंचायत बिनविरोध करण्यास ग्रामस्थांना यश


 

हवालदारवाडी ग्रामपंचायत बिनविरोध करण्यास ग्रामस्थांना यश


माणदेश एक्सप्रेस न्युज

म्हसवड/अहमद मुल्ला : माण तालुक्यातील हवालदारवाडी- कासारवाडी ग्रामपंचायत अखेरच्या क्षणी बिनविरोध करण्यात हवालदारवाडी कासारवाडी ग्रामस्थांनी यश मिळविले.


माण तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेत लोकसहभागातून श्रमदान करुन पाणी टंचाई मुक्त केलेल्या या गावा कायमस्वरुपी सलोखा राखण्यासाठी सात सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायतीची निवडणुक बिनविरोध व्हावी यासाठी ग्रामस्थांनी प्रथमपासुनच प्रयत्न सुरु केले होते. हवालदारवाडीतील प्रत्येक वार्डात प्रत्येकी एक प्रमाणे निवडणुकीचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते परंतु कासारवाडीतील वार्डात  मात्र बिनविरोध सदस्य निवडण्यास अपयश येत असल्याची वस्तुस्थिती निदर्शनास येतात हवालदारवाडी व कासारवाडीतील ग्रामस्थांनी बैठक घेऊन कासारवाडीतील वार्डात एकमेकाविरोधात भरलेले उमेदवारी अर्ज काढुन घेण्यास व या वार्डातीलही निवडणुक बिनविरोध करण्यास अखेर यश मिळविले व एकमेकालगतच असलेल्या भाटकी, इंजबाव ग्रामपंचायत पाठोपाठ हवालदारवाडी - कासारवाडी ग्रामपंचायतचीही निवडणुक बिनविरोध करण्यास ग्रामस्थांना आज यश आले. 


बिनविरोध करण्यात आलेले वार्ड निहाय उमेदवार पुढील प्रमाणे

  • वार्ड क्रमांक एक
  • सौ.सीमा निशिकांत जितकर  
  • सौ शोभा शिवाजी दुधाने 
  • श्री.दशरथ किसन जाधव

  • वार्ड क्रमांक दोन
  • सौ. स्मिता अरूण सावंत
  • मनुबाई यशवं सुतार 

  • वार्ड क्रमांक तीन
  • श्री. अंकुश दत्तात्रय सावंत 
  • सौ. सारीका संतोष गायकवाड


ही निवडणुक बिनविरोध करण्यास हरिभाऊ सावंत महादू सावंत, गणपूभाऊ सावंत, नवनाथ मास्तर, बाबूराव सावंत ज्ञानेश्वर गायकवाड, सुरेश गायकवाड, गोपाळतात्या सावंत, नानाशेठ गायकवाड, संतोष जगदाळे, ब्रम्हदेव काटकर, निशिकांत ( बंडू) जितकर, काकासाहेब धनवडे, नंदकुमार ( सर) धनवडे, चिंटा  धनवडे, पोपटराव फरतडे, नारायण जितकर याबरोबरच रंग कामगार नेते धनाजीराव सावंत आदींनी परिश्रम घेतले.


Join Free Whatasup Group माणदेश एक्सप्रेसPost a comment

0 Comments