अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ कोरोना पॉझिटीव्ह

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ कोरोना पॉझिटीव्ह
 अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ कोरोना पॉझिटीव्ह


नाशिक : राज्यात कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले असून अनेक मंत्र्यांना कोरोनाने आपल्या विळख्यात ओढले असून आता अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. छगन भुजबळ यांनी स्वतः ट्वीट करून माहिती दिली. संपर्कात आलेल्या लोकांनी टेस्ट करून घ्यावी असे आवाहन केले आहे.

माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. गेल्या दोन तीन दिवसात माझ्या संपर्कात अलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करून घ्यावी. माझी प्रकृती उत्तम असून काळजी करण्याचे कारण नाही.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी. मास्क,सॅनिटायझरचा नियमित वापर करा. असे ट्वीट त्यांनी केले आहे.


Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
Post a comment

0 Comments