“जाऊ द्या ना ताई! नवी मुंबईत भाजप जिंकणार हे जनतेनेच ठरवलंय” : आशिष शेलार

“जाऊ द्या ना ताई! नवी मुंबईत भाजप जिंकणार हे जनतेनेच ठरवलंय” : आशिष शेलार
 “जाऊ द्या ना ताई! नवी मुंबईत भाजप जिंकणार हे जनतेनेच ठरवलंय” : आशिष शेलार


मुंबई : खासदार सुप्रिया सुळे यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. त्यावेळी त्यांनी गणेश नाईक यांच्यावर तोफ डागली होती. 'भाजप आमदाराच्या गुंडगिरीचा व्हिडिओ समोर आला आहे. इंटरनॅशनल डॉनशी संबंध असल्याचं या आमदारानं म्हटलं आहे. हे वक्तव्य राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनं अतिशय गंभीर आहे. त्याबाबत मी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिणार आहे. याप्रकरणी एसआयटी नेमून चौकशी करावी, अशी मागणी मी त्यांच्याकडे करणार आहे', असं सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या.
सुप्रिया सुळे यांच्या या वक्तव्यावर भाजपचे नेते, आमदार आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'गणेश नाईक यांच्या भाषणातील विधानाची एसआयटी चौकशी करायची तर मग, तसे बरेच विषय आहेत. आझाद काश्मीरचा बोर्डवाली मेहक प्रभू, शर्जिल, त्याला पळून जायला मदत करणारे, पूजा चव्हाणचा मृत्यू... अशा ट्रकभर 'एसआयटी' कराव्या लागतील,' असं शेलार यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. 'जाऊ द्या ना ताई! नवी मुंबईत भाजप जिंकणार हे जनतेनेच ठरवलंय!,' असा खोचक टोलाही शेलार यांनी मारला आहे.

Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
Post a comment

0 Comments