माघी वारीसाठी पंढरीत येणाऱ्या दिंड्यांना प्रतिबंध ; या शहरात २४ तास संचारबंदीचे आदेश

माघी वारीसाठी पंढरीत येणाऱ्या दिंड्यांना प्रतिबंध ; या शहरात २४ तास संचारबंदीचे आदेश

 माघी वारीसाठी पंढरीत येणाऱ्या दिंड्यांना प्रतिबंध ; या शहरात २४ तास संचारबंदीचे आदेश


पंढरपूर : माघी एकादशी २३ फेब्रुवारी रोजी आहे.यंदाची माघी वारीसाठी पंढरीत येणाऱ्या दिंड्यांना प्रतिबंध घालण्यात आला असून, विठ्ठल दर्शनही बंद ठेवण्यात आले आहे. तसेच जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी शहरात २४ तास संचारबंदीचे आदेश काढले आहेत. 


पंढरपूर शहरासह शेगाव दुमाला, लक्ष्मी टाकळी, वाखरी, गोपाळपुर, कोर्टी, गादेगाव, शिरढोण, कौठाळी, चिंचोली भोसे, भटुंबरे अशा गावातही कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता एकादशीला म्हणजेच २२ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री १२ ते २३ फेब्रुवारी रात्री बारापर्यंत संचारबंदी लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी रात्री उशिराने पारित केले.
दशमी म्हणजेच २२ आणि एकादशी म्हणजेच २३ फेब्रुवारी असे दोन दिवस श्री विठ्ठल आणि रूक्मिणीमातेचे मुखदर्शन सामान्य भाविकांना पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असल्याचा निर्णय मंदिर समितीने यापूर्वीच घेतला आहे. तसेच माघी वारीसाठी पंढरपूर कडे येणाऱ्या पायी दिंड्यांना अटकाव करणे, शहरातील मठ धर्मशाळा मध्ये भाविकांना वास्तव्य करू न देणे, असेही आदेश यानिमित्ताने काढण्यात आले आहेत.तसेच शहरात दूरवरचे ठिकाण निश्चीत करुन एसटी सेवेतील प्रवासी वाहतूक सुरळीत चालू ठेवण्याच्या दृष्टीने स्थानिक पातळीवर योग्य त्या उपाययोजना करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आलेले आहेत. 


Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेसPost a comment

0 Comments