कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साधणार आज राज्यातील जनतेशी संवाद

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साधणार आज राज्यातील जनतेशी संवाद

 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साधणार आज राज्यातील जनतेशी संवाद 


मुंबई : आठ ते दहा महिन्यांनंतर राज्यातील ठप्प झालेलं जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच राज्यात कोरोनाची लाट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मागील आठवड्यापासून राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वेगानं वाढत असून, राज्य सरकारने जिल्हा पातळीवरील यंत्रणांना तातडीने निर्णय घेऊन पावलं उचलण्याचे निर्देश दिले आहेत. महत्त्वाचं म्हणजे मुंबई, पुणे, औरंगाबादबरोबर विदर्भातील नागपूर, यवतमाळ, अमरावती या जिल्ह्यांमध्येही कोरोनानं डोकं वर काढलं आहे. इतर जिल्ह्यातही रुग्णांची संख्या वाढताना दिसत असून, राज्य सरकारकडून नागरिकांना सूचनांचं पालन करण्याचं व खबरदारी घेण्याचं आवाहन केलं जातं आहे.
नागरिकांकडून सूचनांचं पालन होत नसल्याचंही दिसत आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये निर्बंध आणण्यास सुरूवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री ७ वाजता राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. राज्य सरकारकडून काही निर्बंध आणले जाण्याची शक्यता मागील काही दिवसांपासून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आज काही महत्त्वाची घोषणा करणार का? याकडेही सगळ्याचं लक्ष असणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी नागरिकांनी पुन्हा लॉकडाउन केला जाऊ शकतो, असा इशारा आधीच दिलेला आहे. 


Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
Post a comment

0 Comments