Type Here to Get Search Results !

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना कोरोनाची लागण




मुंबई : राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यानंतर आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून सातत्याने फिल्डवर असणाऱ्या आरोग्यमंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे. रात्री उशिरा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.





माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने कोरोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईन. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणे दिसल्यास तत्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी’, असे ट्वीट राजेश टोपे यांनी केले आहे.


Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies