“महाराष्ट्रात अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या चित्रपटांचे शूटिंग होऊ देणार नाही” : नाना पटोले

“महाराष्ट्रात अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या चित्रपटांचे शूटिंग होऊ देणार नाही” : नाना पटोले

मुंबई : शेतकरी आंदोलनावरुन मोदी सरकारवर टीका करणाऱ्या काँग्रेसनं आता थेट बॉलिवूड कलाकारांवरही निशाणा साधला आहे. काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष नाना पटोले यांनी अमिताभ बच्चन व अक्षय कुमार यांचे चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेतली आहे.
मनमोहन सरकारच्या बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार ट्विटरच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बाजूने बोलत होते. मात्र, आता त्यांनाही शेतकऱ्यांचा विसर पडला आहे. भविष्यात काँग्रेस महाराष्ट्रात अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या चित्रपटांचे शूटिंग होऊ देणार नाही तसंच, त्यांचे चित्रपटही प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशाराच नाना पटोले यांनी दिला आहे.


Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस

Post a comment

0 Comments