भाजपचे संकटमोचकच सापडले संकटात ; भाजपचे नऊ नगरसेवक शिवसेनेत !

भाजपचे संकटमोचकच सापडले संकटात ; भाजपचे नऊ नगरसेवक शिवसेनेत !जळगाव : युती सरकारच्या काळात भाजपचे संकटमोचक म्हणून वावरणारे माजी मंत्री आमदार गिरीश महाजन सध्या संकटात सापडले असून जळगावच्या ९ नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. 
जळगाव महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठीची निवडणूक अवघ्या जवळ आली असतनाचा सत्ताधारी भाजपमध्ये मोठी फुट पडली आहे. भाजपविरोधात बंड पुकारलेल्या २७ नगरसेवकांपैकी नऊ नगरसेवकांनी सोमवारी मुंबईत मातोश्रीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केल्याची माहिती नगरसेवक कुलभूषण पाटील यांनी एका दैनिकाला दिली आहे. 


Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस 


Post a comment

0 Comments