प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त सामाजिक उपक्रम : २०० जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप

प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त सामाजिक उपक्रम : २०० जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटपमाळशिरस/विष्णू भोंगळे : माळशिरस तालुक्यातील  इस्लामपूर येथे रोहितभाऊ रणदिवे यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्त बापूसाहेब वाघमारे मित्र मंडळ, रणदिवे परिवार व रोहित भाऊ मित्र परिवार यांच्या वतीने २०० जीवनावश्यक वस्तूंचे किटचे नागरिकांना वाटप करून आगळावेगळा सामाजिक उपकार्यक्रम साजरा करण्यात आला. 


यावेळी पंचायात समिती सदस्य गौतमआबा माने, दलित महासंघ प.म.  अध्यक्ष राजाभाऊ खिलारे, महाराष्ट्र उपाध्यक्ष R.PI (P.G) रमेशभाऊ धाईंजे, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष उमाजी मिसाळ, संघर्ष ग्रुप महाराष्ट्र अध्यक्ष भैयासाहेब धाइंजे, संघर्ष ग्रुप महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष दादा सावंत, शिवाजी धाइंजे माजी सरपंच इस्लामपूर, शेखरभैया खिलारे युवा सेना अकलूज शहर प्रमुख, माउली धाइंजे, नाना नलवडे, रोहित नलवडे, नामदेव मिसाळ, अभिजित रणदिवे, संपत रणदिवे, विठ्ठल वाघमारे, रुक्मिणी रणदिवे, वैशाली वाघमारे, अनिता मिसाळ, यांच्या हस्ते गरजू कुटुंबाना 200 किटचे वाटप करण्यात आले. तसेच पुरंदावडे, मांडवे येथे जीवनावश्यक किट व  महिलांना 100 साड्या वाटप करण्यात आल्या. सदर कार्यक्रमासाठी सरपंच जयवंत पालवे, तंटामुक्ती अध्यक्ष महादेव पालवे, टेळे, बाळु मिसाळ आदी उपस्थित होते.


Join Free WhatsApp Group माणदेश एक्सप्रेसPost a Comment

0 Comments