Type Here to Get Search Results !

“अजित पवारांकडे जी माणुसकी लागते ती सुद्धा नाही” : भाजप नेत्याने केला संताप व्यक्त

 



मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार शुक्रवारी बीड दौऱ्यावर असताना त्यांच्या ताफ्यासमोर आंदोलन करण्यात आलं. सेवेत सामावून घेण्याचं निवेदन देण्यासाठी वेळ न दिल्याने कोरोना काळातील कंत्राटी पद्धतीवरील कर्मचाऱ्यांनी संतप्त होऊन थेट अजित पवार यांचा ताफाच अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला असता दोन महिला कर्मचारी जखमी झाल्या. दरम्यान, या घटनेवरून खासदार निलेश राणे यांनी अजित पवारांवर टीका केली आहे.

निलेश राणे यांनी ट्वीट करत आपला संताप व्यक्त केला आहे. “बीडमध्ये उपमुख्यमंत्री यांना आरोग्य कर्मचारी निवेदन देण्यासाठी गेलेल्या महिलांना काय वागणूक मिळाली बघा,” असं सांगत निलेश राणे यांनी ट्विटरला व्हिडीओ शेअर केला आहे. “अजित पवारांनी ‘Guard of honour’ पावसामुळे नाकारला म्हणून त्यांचं काही मीडीयावाले कौतुक करतायत पण अजित पवारांकडे १० सेकंद थांबून विचारपूस करायला जी माणुसकी लागते ती सुद्धा नाही,” अशी टीका यावेळी त्यांनी केली आहे.







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies