जयंतराव पाटील यांच्या नेत्तृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस मजबूत करणार : वैभव पाटील यांचे उद्‌गारआटपाडी : कोणत्याही पदाची अभिलाषा न ठेवता जयंतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बळकटीसाठी आमचे निरपेक्ष प्रयत्न राहणार आहेत, असे उदगार खानापूर आटपाडीचे युवा नेते, विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी काढले.राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यकारणी सदस्या सौ. सुजाता अरुण टिंगरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दिघंची येथील विटा अर्बन बँकेच्या सभागृहात आयोजित महिला कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात वैभव पाटील बोलत होते.दिघंचीतील महिलांनी कोणताही उदयोग व्यवसाय सुरू करून आमच्याकडे यावे त्या व्यवसायाला १० लाख रुपये बिनव्याजी उपलब्ध करून देऊच तथापि विट्यात नगरपालीकेच्या गाळ्यात विक्री स्टॉल साठी जागा मिळवून देतानाच आमच्या समुहात काम करणाऱ्या २००० कर्मचाऱ्यांना तुमच्या उत्पादनाचे हक्काचे ग्राहक बनविण्यासाठी आग्रही राहू, असेही वैभव पाटील यांनी स्पष्ट करून सौ. शैलजामाई जयंतराव पाटील यांच्या मार्गदर्शना खालील इस्लामपूरातील महिला उद्योग पाहण्यासाठी महिलांच्या प्रतिनिधी मंडळाला नेण्याचे अभिवचन त्यांनी दिले. यावेळी राज्यस्तरीय पंचगव्य रत्न पुरस्कार मिळाल्या बद्दल विवेकानंद जितकर आणि सौ. सुजाता जितकर यांचा तसेच वाढदिवसानिमित्त सौ. सुजाता आणि अरुण या टिंगरे दांम्पत्याचा सत्कार वैभवदादा पाटील यांच्याहस्ते करण्यात आला.

सुजाताताई, तुमच्या सारख्या भगिनींनी सर्वच समाज घटकांसाठी समर्पित होऊन काम केल्यास राज्याच्या शक्तीशाली महिला नेत्या, दीन-दुखितांच्या पाठीराख्या सौ.शैलजादेवी जयंतराव पाटील तुम्हां सर्वांच्या कामाने प्रभावीत होऊन आटपाडी तालुक्याच्या प्रगतीसाठी, माता, भगिनी, युवतींच्या, सक्षमीकरणासाठी पुढे येतील. तुम्हां सर्वांचे इथे येवून कौतूक करतील, तुम्हां सर्वांचा भक्कम आधार बनतील अशा भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्यकारणी सदस्य सादिक खाटीक यांनी यावेळी बोलताना व्यक्त केल्या. गरीब-श्रीमंत, जात-पात, उच्च-कनिष्ट, गट-तट असा कसलाही भेदभाव न करता दिघंची आणि परिसरातील जनता चांगल्या कार्याची दखल घेत त्या लोकाभिमुख व्यक्तीला साथ देते हा इतिहास असल्याचे स्पष्ट करून सादिक खाटीक यांनी, नारायणराव पुसावळे या दिघंचीतील युवकाला लोकनेते राजारामबापू पाटील यांनी ३५ वर्षापूर्वी आपल्या परिवारात स्थान दिले. जयंतराव पाटील साहेबांचा विशेष प्रेम, जिव्हाळा आटपाडी तालुक्यावर सदैव राहीला असून वैभव, यांनी जयंतराव पाटील साहेबांच्या माध्यमातून आटपाडी तालुक्यातल्या महिलांच्या ५० टक्के शक्तीला रोजगार मिळवून मिळवून दिल्यास संपूर्ण तालुका राष्ट्रवादीमय झाल्याशिवाय राहणार नाही. असे ही सादिक खाटीक यांनी शेवटी स्पष्ट केले.
यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या तालुका अध्यक्षा सौ. अश्विनी कासार, वैशाली सरताळे, सौ. पुजा गुरव, निर्मला शेणवे यांनी महिलांसाठी उद्योग व्यवसाय उभारावेत अशी मागणी केली, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस खानापूर तालुका अध्यक्ष शाहरुख पठाण, दिघंची शहर अध्यक्ष प्रतापराव देशमुख यांची भाषणे झाली. यावेळी खानापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष सचिन शिंदे, खानापूर शहर राष्ट्रवादी च्या शोभाकाकी माने, वैशाली दाबुगडे, जिल्हा कार्यकारणी सदस्य मनोज भोसले, रमेश मोहिते ,रुद्रकाली, आबासाहेब नांगरे-पाटील, अश्विन कुमार नांगरे-पाटील, विनोद बनसोडे, राशिद जमादार, प्रशांत गावडे, दत्ता पुसावळे, प्रशांत गाढवे, शेखर पडळे, आप्पासाहेब फडतरे, संजय खटके, आटपाडी शहर अध्यक्षा आस्मा शेख, सीमा शिंदे, अश्विनी शिंदे ,सुवर्णा टिंगरे इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सागर मोरे यांनी केले तर आभार रुतुराज देशमुख यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad