Type Here to Get Search Results !

“शोले’चा रिमेक करण्याचा विचार आहे म्हणे…” : 'या' भाजप नेत्याची शरद पवार, संजय राऊतांवर टीका




मुंबई : निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी पुन्हा सोमवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली. याआधी ११ जून रोजी मुंबईतही प्रशांत किशोर यांनी पवारांशी तीन तास चर्चा केली होती. सोमवारी झालेल्या बैठकीनंतर आज शरद पवार यांच्या निवासस्थानी विरोधी पक्षांतील नेत्यांची बैठक होत असून, या सर्व घडमोडींवर भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी ट्वीट करून निशाणा साधला.

 “भारतीय राजकारणातील चाणक्य आणि भावी पंतप्रधान यांनी दिल्लीत बैठक घेतली. त्यात जावेद अख्तरही होते. ‘शोले’चा रिमेक करण्याचा विचार आहे म्हणे… त्यात ‘अन्ग्रेजो के जमाने के जेलर’च्या भूमिकेत संजयच हवा असा हट्टच साहेबांनी धरल्याची चर्चा आहे,” असा टोला अतुल भातखळकर यांनी शरद पवार आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना लगावला आहे.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies