Type Here to Get Search Results !

विट्याच्या राजकारणात खळबळ : विद्यमान नगरसेवक पद्मसिंह पाटील यांचा राजीनामाविटा : विट्याच्या राजकारणामध्ये खळबळ माजली असून विटा नगरपालिकेतील सत्ताधारी गटाचे विद्यमान नगरसेवक व माजी आमदार सदाशिवराव पाटील यांचे पुतणे पद्मसिंह सुभाष पाटील यांनी गुरुवारी आपल्या नगरसेवक पदाचा राजीनामा जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्याकडे दिला. नगरसेवक पाटील यांच्या या राजीनामा सत्राने मात्र विट्याच्या राजकारणा बरोबरच पालिकेच्या राजकीय पटलावर खळबळ उडाली आहे.


राजकारण, समाजकारण मध्ये माझी जनते प्रती तळमळ बघून जनते पोटी मी निवडणुकीत #लोकनेते कै #हणमंतराव_पाटील ( साहेब ) यांचा...

Posted by Padmasinh Patil on Thursday, 17 June 2021
विटा नगरपालिकेच्या सन २०१६ च्या निवडणुकीत पद्मसिंह पाटील यांनी प्रभाग क्र. ११ मधून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत ते मोठ्या मताधिक्याने विजयी झाले होते. नगरसेवक पाटील यांनी अचानक आपल्या नगरसेवक पदाचा राजीनामा गुरुवारी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्याकडे सादर केला.


माझ्या देव समान नागरीकांना पत्र , विषय - युवा नेत्यांची हुकुमशाही थांबण्या बाबत. आज तुम्हाला मी...

Posted by Padmasinh Patil on Wednesday, 16 June 2021घरगुती अडचणीमुळे मी काम करू शकत नसल्याचे कारण देत नगरसेवक पाटील यांनी माझा राजीनामा त्वरित मंजूर करण्याची विनंती त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.असली तरी त्यांचा सर्व रोख हा माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांच्या दिशेने आहे. 
याबाबत त्यांनी दिनांक १६ रोजी फेसबुक पोस्ट लिहित युवा नेत्यांची हुकुमशाही थांबण्या बाबत आज तुम्हाला मी जाहीर पत्र लिहीत आहे. असे म्हणत आपल्या मनांतील खदखद व्यक्त केली. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies