Type Here to Get Search Results !

आटपाडी तालुक्यात आज दिनांक १८ रोजी कोरोनाचे ३४ नवे रुग्ण तर ३९ कोरोनामुक्त : रुग्ण संख्या लागली वाढू



आटपाडी :  आटपाडी तालुक्यात पुन्हा हळूहळू कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने पुन्हा एकदा आरोग्य सेवेवरचा ताण वाढणार आहे. लॉकडाऊनमुळे रुग्ण संख्या आटोक्यात आली होती. परंतु लॉकडाऊन बंद करण्यात आले त्यामुळे व्यापारी पेठेतील सर्व दुकाने चालू झाली असल्याने पुन्हा रुग्ण वाढण्याचे प्रमाण वाढले आहे. आज दिनांक १८ रोजी कोरोनाचे ३४ नवे रुग्ण आढळून आले असून ३९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 




बाधित रूग्णामध्ये आटपाडी ०४, दिघंची ०२, घाणंद ०१, घरनिकी ०२, हिवतड ०४, जांभूळणी ०३, कटफळ ता.सांगोला ०६, खरसुंडी ०१, खवासपूर ता. सांगोला ०१, निंबवडे ०१, पिंपरी खुर्द ०३, विभूतवाडी ०२, विठ्ठलापूर ०२, यपावाडी ०१, झरे ०१,  या गावातील रुग्णांचा समावेश आहे.



बाधित रूग्णामध्ये पुरुष रुग्ण २६  तर स्त्री रुग्ण ०८ असे  ३४ रुग्ण कोरोना बाधित आढळून आले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. साधना पवार यांनी दिली.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies