खाजगी रूग्णालयात झालेल्या खर्चाचा परतावा मिळावा यासाठी अर्ज करण्यास सुरुवात अशा आशयाची समाज माध्यमावर फिरणारी पोस्ट खोटीसांगली : कोरोनामुक्त नागरिकांनी खाजगी रूग्णालयात झालेल्या खर्चाचा परतावा मिळावा यासाठी अर्ज करण्यास सुरुवात केली आहे, अशा आशयाची समाज माध्यमावर फिरणारी पोस्ट खोटी असून अशा अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या  जिल्हा कार्यालयामार्फत करण्यात आहे.

मा.मुंबई उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ यांचे जनहति याचिका क्र. 49/2020 नुसार आलेल्या निर्णय संदर्भात समाजमाध्यमावरून फिरणाऱ्या पोस्टचा आधार घेत कोरोनामुक्त नागरिकांनी खाजगी रूग्णालयात झालेल्या खर्चाचा परतावा मिळावा यासाठी अर्ज करण्यास सुरवात केली आहे. मात्र आलेल्या अर्जाच्या अनुषंगाने राज्यस्तरावरून कोणतेही निर्देश नसल्याने महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत नसलेल्या खाजगी रूग्णालयात रूग्णाने कोरोनाच्या उपचारासाठी केलेल्या खर्चाचा परतावा योजनेच्या माध्यमातून मिळवून देण्याचा अद्याप कोणताही निर्णय नाही. अशी माहिती महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या समन्वयकांमार्फत देण्यात आली आहे.

कोरोनाच्या संसर्ग काळात जिल्ह्यात बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या काळात अनेक रुग्णांनी योजनेअंतर्गत असलेल्या खाजगी रुग्णालयात उपचार घेतले. अशा रुग्णांना झालेला वैद्यकीय खर्च परत मिळावा यासाठी न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. या याचिकेच्या अनुषंगाने खाजगी रुग्णालयात झालेल्या कोरोनाच्या उपचाराचा खर्च शासनाकडून मिळेल अशा पोस्ट समाजमाध्यमातून व्हायरल झाल्या आहेत. त्यामुळे कोरोनाच्या उपचाराच्या खर्चाचा परतावा मिळण्याच्या आशेने विविध खजगी रुग्णालयामध्ये उपचार घेणाऱ्या नागरिकांनी आता जिल्हा प्रशासनाकडे अर्ज करण्यास सुरुवात केली आहे.   मात्र जिल्हा प्रशासनाला यासंदर्भात कोणतेही निर्देश नाहीत त्यामुळे कार्यालयात अर्ज दाखल करुन पुढील पडताळणीसाठी जिल्ह्याच्या समन्वयकडे पाठविले जात आहेत. कोरोनाचा खाजगी रुग्णालयातील उपचाराचा खर्च मिळावा यासाठी आतापर्यंत दोनशेहून अधिक अर्ज दाखल झाले आहेत. त्यातील जिल्हा समन्वयकाने सर्व अर्जाची पडताळणी करुन योजनेअंतर्गत असलेल्या खाजगी रुग्णालयाविरुध्द असलेल्या अर्जाची दखल घेऊन कार्यवाही चालू केली आहे.

न्यायालयाच्या निर्णयाचा चुकीच्या पध्दतीने अर्थ लावून हे अर्ज केले जात आहेत त्यामुळे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट सांगितले आहे की, योजनेअंतर्गत नसलेल्या खाजगी रुग्णालयाविरुध्द अर्ज स्विकारले जाणार नाहीत वा दखल घेतली जाणार नाही. योजनेअंतर्गत असलेल्या खाजगी रुग्णालयाविरुध्द जर तक्रारी असतील तर महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या जिल्हा समन्वयक अथवा विमा कंपनीच्या जिल्हा प्रमुखांशी संपर्क साधावा.


सांगली जिल्ह्यात महत्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत एकूण 10 खाजगी रुग्णालये कोविड उपचारासाठी कार्यरत आहेत. खाजगी रुग्णालये, वॉन्लेस हॉस्पिटल मिरज, भारती विद्यापीठ हॉस्पिटल सांगली, वाळवेकर हॉस्पिटल सांगली, कुल्लोळी हॉस्पिटल सांगली, मेहता हॉस्पिटल सांगली, विवेकानंद हॉस्पिटल बामणोली, प्रकाश ममोरियल क्लिनिक इस्लामपूर, प्रकाश रिसर्च सेंटर इस्लामपूर, देशमुख (सत्रे) हॉस्पिटल इस्लामपूर, श्री सेवा मल्टीस्पेसीएलटी हॉस्पिटल आटपाडी.महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत असलेल्या खाजगी रुग्णालयाबरोबर सामंजस्य करार असल्यामुळे त्या रुग्णालयावर फक्त कार्यवाही करण्याची तरतूद आहे त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी करुन त्यात योजनेच्या नियमात बसत असेल तरच त्या अर्जाचा विचार केला जाणार असल्याचे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या जिल्हा कार्यालयातून सांगण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured