Type Here to Get Search Results !

कोव्हीड योध्यांचा गौरव ; मान्यवरांनी केले स्वयंसेवकांचे कौतुक
दिघंची : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत दिघंची पंचक्रोशीतील रुग्णांची सेवा बजावणाऱ्या श्रीमंत बाबासाहेब देशमुख आरोग्य मंदिर या कोरोना केअर सेंटर मधील कोरोना योध्यांचा गौरव माजी सभापती हर्षवर्धन देशमुख, जि.प. सदस्य मोहन रणदिवे, युवा नेते जयवंत सरगर, तहसीलदार सचिन मुळीक,पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी साधना पवार,  डॉ. विनायक पवार यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी कोविड सेंटर मध्ये केलेल्या नियोजनाचे व सेवेचे कौतुक उपस्थित मान्यवरांनी करत कौतुकाची थाप स्वयंसेवकांच्या पाठीवर दिली. श्रीमंत बाबासाहेब देशमुख आरोग्य मंदिरा मध्ये केलेली रुग्णांची सेवा संपूर्ण सांगली जिल्ह्यात आदर्शवत होती असे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले. या कार्यक्रमात लेखक डॉ.कालिदास शिंदे तसेच एनएमएमएस परीक्षेत जिल्यात द्वितीय आलेला अमृत पांढरे, सेवानिवृत्त शिक्षक जमदाडे सर यांचा ही सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे स्वागत ग्रा.पं. सदस्य सदस्य प्रणव गुरव यांनी केले. कार्यक्रमास नानभाऊ मेनकुदळे, आण्णासाहेब रणदिवे, सावंत पुसावळे, दशरथ मोरे, आबासो पुजारी, कृष्णदेव मोरे, बंडू पाटील, सोपानराव काळे, ग्रा.पं. सदस्य अजित मोरे, चंद्रकांत पुसावळे, केशव मिसाळ, प्रकाश शिंदे तसेच अविनाश रणदिवे, शेखर रणदिवे, अण्णासाहेब जाधव, अनिल सूर्यवंशी, निनाद मोरे, अमोल सावंत, पिंटू भाळवनकर, प्रशांत चोथे, प्रमोद गुरव, जोतिराम काटकर, मनोज खटके, सद्दाम झारी, केवल कवडे, सागर मेनकुदळे, अक्षय गोंजारी, अमरसिंह ऐवळे, शहानवाज अत्तार, अक्षय यादव, समाधान रणदिवे, आबा कासार, समाधान पालसांडे, सुधीर घोंगडे, गणेश जाधव, मुजु तांबोळी, शिवानंद सुतार, अमोल काटे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार ऋतुराज देशमुख यांनी मानले.
Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies