सांगली जिल्ह्यातील "या" ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन


सुरतच्या लुथ्रा ग्रुपकडून उभारणी : एकाच वेळी ५० बेडला ऑक्सिजन पुरवठ्याची क्षमता


कडेगाव : चिंचणी तालुका कडेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात  उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन निर्मिती  प्रकल्पाचे  शनिवारी उद्घाटन करण्यात आले. महाराष्ट्र शासन आणि सुरत गुजरात येथील लुथ्रा ग्रुपच्या ग्रीन जीन एन्व्हायरो प्रोटेक्शन अँड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या संयुक्त विद्यमाने  ग्रामीण रुग्णालय चिंचणी येथे ऑक्सिजन निर्मिती  प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे. आमदार  मोहनराव कदम यांच्या हस्ते ग्रामीण रुग्णालयाकडे हस्तांतरण करून हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला . यावेळी कडेगावचे प्रांताधिकारी डॉ.गणेश मरकड,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.संजय साळुंखे, माजी सभापती मंदाताई करांडे, लुथ्रा ग्रुपचे पंकज आम्ले, संदीप देसाई, राजेश मेहता, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आशा चौगुले, वैद्यकीय अधिक्षक डॉ. अधिक पाटील, डॉ. आशिष कालेकर, डॉ.पोर्णिमा शृंगारपुरे, डॉ.मिलिंद मदने, डॉ.सुधीर डुबल, डॉ.नागेश शिंदे, डॉ.अमोल दळवी, चिंचणीच्या सरपंच सौ. मनीषा माने, उपसरपंच दीपक महाडिक, नंदकुमार माने, आनंदराव पाटील, श्रीपती माने, वैभव पवार, रामचंद्र महाडिक, सर्जेराव माने, संतोष पाटील आदी उपस्थित होते.


प्रकल्प उभारणी केलेल्या लुथ्रा ग्रुपकडून  ग्रामीण रुग्णालयाकडे हस्तांतरण करण्यात आले .हवेतून ऑक्सिजन  निर्मिती करणाऱ्या या  प्रकल्पाची एकाच वेळी ५० बेडला ऑक्सिजन पुरवठा करण्याची क्षमता असल्याने आता रुग्णालयात आता  बाहेरून ऑक्सिजन सिलेंडर घेण्याची आवश्यकता  भासणार नाही. चिंचणी येथील ग्रामीण रुग्णालयात सद्या ३० बेडचे डेडीकेटेड कोविड सेंटर सुरू आहे. या रुग्णालयात आवश्यक असणाऱ्या ऑक्सिजनची निर्मिती येथेच व्हावी या दृष्टीने या प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे. लुथ्रा ग्रुपने कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सीबिलिटी या उपक्रमाअंतर्गत संपूर्ण खर्च करून  हा प्रकल्प उभारला असून या प्रकल्पातुन  १६७  एलपीएम (प्रति मिनिट) ऑक्सिजन निर्मिती होणार आहे. असे लुथ्रा ग्रुपचे पंकज आम्ले यांनी सांगितले.
Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured