Type Here to Get Search Results !

आटपाडी तालुक्यात आज दिनांक २५ रोजी कोरोनाचे ४७ नवे तर २५ रुग्ण कोरोनामुक्त : गावनिहाय रुग्णसंख्या पाहण्यासाठी बातमी सविस्तर वाचा

आटपाडी : आटपाडी तालुक्यात कोरोना बाधित रुग्ण संख्या तीन दिवस कमी झाली होती. परंतु रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असल्याने काही प्रमाणात काळजी देखील वाढली आहे. आज दिनांक २५ रोजी कोरोनाचे ४७ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर बाधितापैकी २५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

 







आजच्या बाधित मध्ये आटपाडी ०५, चिंचाळे ०१, देशमुखवाडी ०१, दिघंची ०५, गळवेवाडी ०२, घानंद ०५, गोमेवाडी ०३, जांभूळणी ०२, काळेवाडी ०२, खरसुंडी ०३, कुंभारी (जत) ०१, कुरुंदवाडी ०३, लेंगरेवाडी ०२, लिंगीवरे ०२, मासाळवाडी ०१, पिंपरी खुर्द ०१, पुजारवाडी (दि.) ०१, उंबरगाव ०२, वलवण ०१, झरे ०४ या गावातील रुग्णांचा समावेश आहे.




 

आज बाधित आलेल्या रूग्णा मध्ये पुरुष रुग्ण २८ व स्त्री रुग्ण १९ असे एकूण ४७ बाधित रुग्ण आढळून आले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. साधना पवार यांनी दिली.


 

 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies