Type Here to Get Search Results !

आटपाडीत मोटारसायकल चोर अटकेतमाणदेश एक्सप्रेस न्युज I आटपाडी : आटपाडी पोलिसांनी मोटार सायकल चोरट्यांना अटक केली असून त्यांच्याकडून मोटारसायकल जप्त करण्यात असून आरोपींना अटक करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आटपाडी पोलीस ठाणे सीआर नं. 345 /2021  अन्वये भारतीय दंड विधान संहिता कलम 379  या गुन्हायामध्ये दुचाकी मोटरसायकल एचएफ डिलक्स कंपनीची  तिचा आरटीओ  एमएच-१०-सीव्ही-४५२५ या क्रमांकाची अंदाजे ३० हजार रुपये किमंतीची मोटरसायकल निंबवडे येथून दिनांक १०/०९-२०२१ रोजी चोरट्यांनी लंपास केली होती. याबाबत बाळू हेगडे यांनी फिर्याद दिली होती.

सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करतात खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर गुन्ह्यातील चोरलेली मोटर सायकल आरोपी  नामे  सुरज तानाजी हेगडे, विष्णू अण्णा चव्हाण दोघे ही राहणार निंबवडे व  सुरज सलीम मुलानी रा. महूद ता. सांगोला, जि. सोलापूर यांनी चोरून नेले बाबत निष्पन्न झाल्याने सदर गुन्ह्याचे कामी आरोपींना अटक करण्यात आली असून सदर आरोपी कडून  मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे यांचे मार्गदर्शनाखाली तपासी अंमलदार नितीन मोरे तसेच पोलीस हवालदार नंदकुमार पवार, जगन्नाथ पुकळे, दिग्विजय कराळे, प्रमोद रोडे, उमर फकीर यांनी केली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies