Type Here to Get Search Results !

नवजात अर्भकाची गुप्तपणे विल्हेवाट लावल्याप्रकरणी महिलेवर गुन्हा दाखल



म्हसवड/प्रतिनिधी : रांजणी ता.माण येथील महिलेने तिच्या पोटी पाच दिवसांपुर्वी जन्मलेले नवजात अर्भक ज्वारीच्या पिकात टाकुन गुप्तपणे विल्हेवाट लावल्या प्रकरणी संबंधित महिला मनिषा शरद ढवळे हिच्या विरोधात म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


या बाबत पोलिस ठाण्यातुन मिळालेली माहिती अशी,  पांडुरंग लक्ष्मण खाडे वय 56 वर्षे धंदा पोलीस पाटील रा. रांजणी ता. माण यांनी म्हसवड पोलीस ठाणेत हजर राहून सदर महिले वर गुन्हा दाखल केला आहे. गावातील शिंगु रामहारी दोलताडे याने पोलीस पाटील दोलताडे यांना फोन करून सांगितले की, आप्पा दगडु ढवळे यांचे शेतातील ज्वारीचे पिकात एक नवजात पुरूष जातीचे मृत अवस्थेत असलेले अर्भक कुत्र्याने ओढुन आणुन शेतात टाकले आहे. सदर ठिकाणी जावुन पाहिले असता सदर पुरूष जातीचे अर्भक मृत अवस्थेत होते. 


त्याबाबत दोलताडे यांनी शेताचे शेजारी असले घरामध्ये सदर मिळुन आले नवजात अर्भका बाबत विचारपुस केली असता आरोपी महिला महिला मनिषा शरद ढवळे हिने सदरचे नवजात अर्भक तिला जन्मते वेळीच मृत अवस्थेत जन्माला आल्याने सदरचे नवजात अर्भक हे तिने ज्वारीचे पिकात पाच दिवसापुर्वी टाकलेचे सांगितले. याबाबत आरोपी मनिषा शरद ढवळे हिने तिचे पोटी जन्मलेले मृत अर्भकाची कोणास काही एक माहीती न देता गुप्तपणे विल्हेवाट लावल्याची व अर्भक जन्मल्याची महिती लपवून ठेवली.


दिनांक 18/01/2022 रोजी सायंकाळी 6:00 वा चे पुर्वी पाच दिवस अगोदर महिला मनिषा शरद ढवळे रा. ढवळेवस्ती रांजणी ता. माण जि. सातारा हिने तिचे पोटी जन्मलेले नवजात अर्भक तिला जन्मते वेळीच मृत अवस्थेत जन्मलेने सदरचे नवजात अर्भक हे तिने ज्वारीचे पिकात पाच दिवसापुर्वी टाकुन तिचे पोटी जन्मलेले मृत अर्भकाची कोणास काही एक माहीती न देता गुप्तपणे विल्हेवाट लावल्याची व अर्भक जन्मल्याची महिती लपवून ठेवल्याने तिचे विरूद्ध तक्रार दाखल केली असून पुढील तपास सपोनि बाजीराव ढेकळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार देवा खाडे करत आहेत.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies