Type Here to Get Search Results !

ऑनलाईन व्यवहार करताना काळजी घेणे गरजेचे...



आटपाडी/बिपीन देशपांडे : अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मुलभूत गरजा आहेत. त्याप्रमाणे मोबाईल हा प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. आजच्या वेगवान धावपळीच्या युगात प्रत्येक जण कामात इतका गुरफटून गेला आहे की स्वतःसाठी वेळ नाही. प्रत्येकाच्या हातात मोबाईल असल्याने जग जवळ आल्याचा भासत आहे. 


सध्या कोरोना संकट काळात बँकेत गर्दी असल्याने घरबसल्या ऑनलाईन माध्यमातून व्यवहार होत असून त्यातून फसवणूक सुद्धा होत आहे. काहीजण संबंधित ग्राहकाला फोन करून मी बॅंकेतून बोलतोय, तुमचे खाते बंद आहे, तुम्हाला मेसेज येईल, ओटीपी सांगा, अनेक वेगवेगळ्या युक्त्या वापरून सहजपणे फसवणूक करून तुमच्या खात्यावरील हजारो लाखो रुपये तुमच्या डोळ्यादेखत क्षणात खात्यावरून पैसे गायब होतात. अशा घटना आटपाडी तालुक्यात घटना घडल्या आहेत. फेसबुक, व्हाट्सअप यावरून मेसेज पाठवून गंडा घातला जात आहे. त्यामुळे ऑनलाइन व्यवहार करताना जागरूक होऊन सावधगिरी बाळगून व्यवहार जपून करणे सध्या गरजेचे आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies