Type Here to Get Search Results !

अलिबागमधील ‘या’ काँग्रेसच्या नेत्याला बेड्या


विरोधात तक्रार करणाऱ्याला खोट्या प्रकरणात अडकवणे काँग्रेसच्या नेत्याला महागात पडले आहे. अलिबाग पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. प्रकृती बिघडल्याच्या कारणावरून अ‍ॅड.  उमेश ठाकूर यांना रुग्णालयात दाखल केले आहे.


आरोपी अ‍ॅड. उमेश ठाकूर यांचा व्यवसाय अवैध आहे. याबाबत पेण तालुक्यातील कोलेटी येथील काशीनाथ ठाकूर हे विविध कार्यालयात तक्रार करत होते. त्यामुळे उमेश ठाकूर याला व्यवसायात मोठे नुकसान होत होते. आपल्या विरोधातील तक्रारीने उमेश ठाकूर हैराण झाला होता. त्यामुळे त्याने झालेल्या गोष्टींचा बदला घ्यायचा ठरवला.शुभम गुंजाळ यांच्या मदतीने काशीनाथ ठाकूर यांच्या नावाचे बनावट फेसबुक अकाऊंट तयार केले. तसेच आपल्याच ओळखीतील मनिषा चोरडेकर हिला त्यावरुन अश्लील व्हिडिओ आणि मेसेजेस पाठवले.या व्हिडिओ आणि मेसेजच्या आधारे मनिषा चोरडेकर हिने काशीनाथ ठाकूर यांच्या विरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला.


तपासीक अंमलदार पोलीस निरीक्षक शैलेश सणस यांनी सायबर सेलची मदत घेतली. सायबर सेलने केलेल्या तपासात धक्कादायक बाब समोर आली. यात शुभम गुंजाळ हा सहभागी असल्याचे उघड झाले. त्याची खोलवर चौकशी केली असता उमेश ठाकूर हा या कारस्थानाचा कर्ता असल्याचे समोर आले.खर तर,ज्या महिलेने तक्रार दिली होती ती मनिषा चोरडेकर या कारस्थानात  सहभागी होती अ‍ॅड.  उमेश ठाकूर, शुभम गुंजाळ आणि मनिषा चोरडेकर या तिघांनाही न्यायलयाने 11 जानेवारी रोजी तीन दिवसांची पोलीस कस्टडी दिली होती. प्रकृतिच्या कारणाने उमेश सरकारी रुग्णालयात आहे. आज दुपारी तिनही आरोपींना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies