‘या’ उमेदवारांना मिळणार रेल्वेत नोकरीची संधी


रेल्वेत नोकरी मिळावी अशी अनेकांची इच्छा असते. भारतीय रेल्वेत इयत्ता १० वी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे. पूर्वोत्तर रेल्वे विभागात गेटमन पदावर मोठी भरती निघाली आहे.


उत्तर पूर्व रेल्वेत फाटकांवर गेटमनच्या पदांसाठी भरती केली जात आहे. यासाठीचं जॉब नोटिफिकेशन ११ जानेवारी २०२२ रोजी लागू करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या नोकरीसाठी कोणतीही परीक्षा देखील घेतली जाणार नाही. अर्ज करण्यासाठी फक्त १० दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे.


गेटमनसाठी ग्रेड पे १८०० (लेव्हल १) वेतनाच्या समान मूल्याइतका पगार दिला जाईल. सध्याचा दर हा जवळपास २५ हजार रुपये दरमहा इतका आहे. ही भरती प्रक्रिया दाखल केलेल्या अर्जांच्याच आधारे केली जाणार आहे.


योग्य उमेदवारांची निवड त्याच्या सैन्य सेवेच्या कालावधीच्या आधारावर केली जाणार आहे. निवड झालेल्या उमेदवाराला रेल्वे हॉस्पीटलमध्ये वैद्यकीय चाचणीला सामोरे जावे लागणार आहे. यात ए-३ चिकित्सा श्रेणीत उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवाराची अंतिम निवड केली जाईल.


रेल्वेत गेटमन वॅकेन्सी २०२२ साठी पूर्वोत्तर रेल्वेच्या ner.indianrailways.gov.in या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज दाखल करा. अर्जासाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. अर्ज केवळ ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारले जातील.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured