Type Here to Get Search Results !

“या” अभिनेत्रीला कोरोनाची लागण; मुंबई महापालिकेने केले घर सील

 


राज्यातील दैनंदिन कोविड  वेगाने घटतेय. तर मुंबईतील रुग्णसंख्याही गेल्या काही दिवसांपासून कमी होतेय. मात्र अभिनेत्री लारा दत्ताला कोरोनाची लागण झाली. मुंबई महानगरपालिकेने  तिचे घर सील केले असून तिच्या घराचा परिसर हा ‘मायक्रो कंटेन्मेंट झोन’ म्हणून जाहीर करण्यात आला आहे. सुदैवाने लारा दत्ताच्या कुटुंबातील इतर कोणालाही कोरोनाचा संसर्ग झाला नाही. गुरुवारी मुंबईत 54 नवे रुग्ण आढळले आणि आज लाराचे घर महापालिकेकडून सील करण्यात आले. नव्याने आढळलेल्या 54 रुग्णांपैकी चार रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे  लागले आहे. मुंबईतील रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांच्या संख्येतही घट झाल्याचे  पहायला मिळाले. सध्या रुग्णालयात केवळ 27 रुग्ण दाखल आहेत.



दैनंदिन रुग्णसंख्या आता वेगाने घटत असल्यामुळे रुग्णांची संख्या ही हजाराच्या खाली गेली आहे. सध्या राज्यात 956 रुग्ण उपचाराधीन आहेत. एप्रिल 2020 नंतर पहिल्यांदाच ही संख्या इतकी खाली गेली आहे. कोविडची पहिली आणि दुसरी लाट ओसरली तरी राज्यातील उपचाराधीन रुग्णांची संख्या एक हजाराच्या खाली कधीच गेली नव्हती. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies