Type Here to Get Search Results !

गोपीचंद पडळकरांनी डिजीटल गनिमी कावा नेमका कसा साधला...!

 



सांगली : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या लोकार्पणावरुन राज्यात नवा वाद पाहायला मिळतोय. अहिल्यादेवी होळकर यांच्या सांगलीतील पुतळ्याचे लोकार्पण राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. मात्र, पवारांच्या हस्ते होणाऱ्या या लोकार्पण सोहळ्याला भाजप आमदार गोपीचंद पडळकर  यांनी तीव्र विरोध केलाय. इतकेच नाही तर आज सांगलीमध्ये पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्ते सांगलीत जमा झाले होते. यावेळी मेंढपाळांच्या हस्ते लोकार्पण करण्याची मागणी पडळकर आणि खोतांनी केली. मात्र, पोलिसांनी त्यांना रोखून धरले. अशावेळी पडळकर यांनी पुन्हा एकदा पोलिसांना चकवा देत डिजीटल गनिमी कावा केला!



एकीकडे गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना मल्हारराव होळकर चौकात पोलिसांनी अडवून धरले होते. त्यावेळी ढोल आणि धनगरी गाण्यांवर कार्यकर्त्यांचे पारंपरिक नृत्य, घोषणाबाजीने वातावरण चांगलेच तापले होते. पडळकर आणि खोत सातत्याने पोलिसांसोबत चर्चा करत होते. आमचे पाच मेंढपाळ जातील आणि पुतळ्याचे लोकार्पण करतील, त्यासाठी परवानगी द्या, अशी मागणी ते पोलिसांकडे करत होते. जवळपास पाच ते सहा तास हा सगळा ड्रामा सुरु होता. त्याचवेळी ड्रोनद्वारे अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली आणि आमच्या दृष्टीने लोकार्पण पार पडल्याचा दावा पडळकर यांनी केला.



लोकांनी एखादी गोष्ट मनावर घेतली, लोकांनी कुठले काम हाती घेतले की कितीही पोलीस बंदोबस्त लावला तरी ते काम अडत नाही. 21 व्या शतकात टेन्कोलॉजीचा वापर करुन आम्ही ड्रोनद्वारे मेंढपाळांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी केली आहे. आमच्या दृष्टीने लोकार्पण सोहळा पार पडला. आम्ही ठरवले होते की पोलिसांसोबत कुठलाही वाद न करता हा सोहळा पार पाडायचा आणि आम्ही ते करुन दाखवले आहे. आता पोलिसांनी आमच्या चार पोरांना ताब्यात घेतले आहे. त्यांना सोडायला जातोय. त्यांना सोडल्याशिवाय आमचे काम पूर्ण होणार नाही, अशी प्रतिक्रिया पडळकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies