“मी नितीन गडकरींचे नाव बदलून स्पायडरमॅन ठेवले आहे", ‘या’ भाजपा खासदाराचे कौतुकास्पद भाष्य!
अरुणाचल: भाजपा खासदार तापीर गाओ यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी याना कौतुकास्पद भाष्य करताना ‘स्पायडरमॅन’ म्हटले आहे. नितीन गडकरींनी देशभरात रस्त्यांचे जाळे उभे केल्याचे सांगताना त्यांनी हे  कौतुकास्पद भाष्य केले आहे.लोकसभेत २०२२-२३ साठी ‘रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अनुदानाची मागणी’ या विषयावरील चर्चेत सहभागी होताना अरुणाचलचे खासदार असणारे तापीर गाओ म्हणाले की, “मी नितीन गडकरींचे नाव बदलून स्पायडरमॅन ठेवले आहे. स्पायडरमॅनच्या जाळ्याप्रमाणे नितीन गडकरी देशाच्या कानाकोपऱ्यात रस्त्यांचे विस्तीर्ण जाळे टाकत आहेत. नितीन गडकरी आहेत तर शक्य आहे”असे ते म्हणाले आहेत.“मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर चीनजवळील सीमेवरही रस्त्याचे बांधकाम वेगाने सुरु आहे. मोदींच्या नेतृत्वात अरुणाचल प्रदेशातील मॅकमोहन लाइनवर दोन पदरी रस्ताही उभा राहत आहे,स्पायडरमॅन आपल्या वेगाने रस्ते बांधणीचे काम सुरु ठेवतील अशी मला आशा आहे,” असेही ते यावेळी म्हणाले आहेत. “भारत-चीन सीमेवर असणाऱ्या संवेदनशील परिसरांचा दौरा करण्यासाठी नितीन गडकरी यांनी एक समिती तयार केली आहे. रस्त्यांची स्थिती ठीक नसल्याने त्यांना यामध्ये जास्त वेळ लागत आहे. पण आता या सर्व ठिकाणी रस्त्यांचं बांधकाम सुरु आहे,” अशी माहिता तापीर गाओ यांनी दिली आहे.Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured